जगात अजूनही अशी अनेक ठिकाणे आहेत जी रहस्यांनी भरलेली आहेत. या ठिकाणी अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे अद्याप शास्त्रज्ञांना सापडलेली नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
जगातील रहस्यमय ठिकाणांमध्ये मेक्सिकोमधील एका गावाचाही समावेश आहे. या गावात मुलं जन्माला आल्यानंतर असा काही प्रकार घडतो, जे खूप आश्चर्यकारक आहे. या गावात लहान मुले जन्माला येतात, पण जन्मानंतर काही दिवसांनी त्यांची दृष्टी जाते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माणसापासून ते प्राणी आंधळे होतात.
मेक्सिकोचे हे गाव ‘अंधांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाते. या विचित्र कारणामुळे हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिले गाव आहे.
मेक्सिकोतील टिल्टपेक गावाला अंधांचे गाव म्हटले जाते. या गावात माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच आंधळे आहेत. टिल्टपेक गाव हे जगातील सर्वात रहस्यमय गावांपैकी एक आहे. जगातील हे एकमेव गाव आहे जिथे फक्त अंध लोक राहतात. मेक्सिकोतील टिल्टपेक या गूढ गावात झापोटेक जमात राहते. येथे लहान मुले जन्माला येतात तेव्हा त्यांचे डोळे पूर्णपणे बरे असतात, परंतु कालांतराने त्यांची दृष्टी निघून जाते. हे केवळ माणसांसोबतच नाही तर प्राण्यांमध्येही घडते. चला तर जाणून घेऊया यामागे काय आहे कारण ?
या गावात राहणाऱ्या जमातीचे लोक एका शापित झाडाला आंधळे होण्याचे कारण मानतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार लवाझुएला नावाचे एक झाड आहे, ज्याला पाहिल्यानंतर माणसांपासून प्राणी-पक्ष्यांपर्यंत सगळेच आंधळे होतात. हे झाड वर्षानुवर्षे या गावात आहे. लोक म्हणतात की हे झाड पाहिल्यानंतर ते आंधळे होतात. मात्र बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ही फक्त अंधश्रद्धा आहे.
जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ ?
ही गावे जिथे आहेत तिथे विषारी माश्या आढळून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या माश्या चावल्यानेच लोक आंधळे होतात. याची माहिती मिळाल्यानंतर मेक्सिको सरकारने गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारलाही यश आलेले नाही. सरकारने या जमातीला दुसऱ्या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर ठिकाणचे वातावरण त्यांना अनुकूल नव्हते. आता त्या लोकांना त्यांच्या जबाबदारीने त्यांच्या परिस्थितीत सोडण्यात आले आहे.