वॉशिंग्टन : अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये बुरशीजन्य रोगाची साथ पसरली असून या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने आपत्कालिन इशारा जारी करावा, अशी मागणी या दोन्ही देशांमधून व्हायला लागली आहे. “सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन’च्या हवाल्याने अमेरिकेतील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
अनेक देश आणि अमेरिकेतील 24 राज्यांमधील शेकडो रुग्णांना कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसाठी मेक्सिकोमधील दोन सुविधांमध्ये आमिष दाखवले गेले होते. त्या शस्त्रक्रियांदरम्यान ही बुरशीची लागण झाली असावी, असा दावा अमेरिका आणि मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
शस्त्रक्रिया झालेल्या 195 रुग्णांच्या प्रकृतीवर “सीडीएस’च्या अधिकाऱ्यांकडून देखरेख केली जाते आहे. मेक्सिकोमध्ये 14 रुग्णांना संसर्ग झाल्याचा संशय आहेत आणि 11 बुरशीजन्य मेनिंजायटीसची संभाव्य प्रकरणे सापडली आहेत. ही लक्षणे मेंदू किंवा पाठीच्या मज्जासंस्थेत संसर्ग असल्याची असू शकतात. तसे चाचण्यांच्या रिपोर्टवरून दिसून आले आहे.
आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना लागण झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेनिंजायटिस हा वेगाने प्रीाणघातक ठरू शकतो, असे “सीडीएस’ने म्हटले आहे. मेक्सिकोमधील अधिकाऱ्यांच्या अलीकडील चाचणी परिणामांमुळे या वर्षाच्या सुरुवातीला मेक्सिकोमध्ये इतरत्र शस्त्रक्रियांशी संबंधित असलेल्या आणखी एका प्राणघातक उद्रेकाच्या पुनरावृत्तीबद्दल चिंता निर्माण झाली आहे, करोनाची साथ आटोक्यात येत असतानाच नव्या कोणत्याही संसर्गाबाबत अतिसावधानता बाळगावी लागत असल्याचे यातून स्पष्ट झाले.