कोथरूड – कोथरूडमधील ओम चॅरिटेबल ट्रस्टची महिला दहीहंडी विशेष आकर्षण ठरली. ट्रस्टचे हे 14 वे वर्ष असून खास महिलांसाठी ही दहीहंडी आयोजित केली जाते. चेंबूर येथील अमरज्योत सेवा मित्र मंडळाच्या मुलींनी ही हंडी फोडली. मनसेचे सरचिटणीस माजी नगरसेवक ऍड. किशोर शिंदे यांच्यासह संजय काळे, गणेश शिंदे, रवी वाल्हेकर, श्रीकांत अमराळे, शशांक अमराळे, धनंजय बलकवडे, विकास जाधव, विराज डाकवे, साधू धुमाळ प्रतिक कंधारे, आकाश बोबडे यांच्यासह सचिन फ्रेंड्स सर्कल, कुंदन ग्रुप व संगम तरुण मंडळ ट्रस्ट यांनी संयोजन केले.
श्री तुळजाभवानी माता मंदिर व राधाकृष्ण सेवा संस्था यांच्या वतीने कोथरूड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी दहीहंडी साजरी झाली. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी नगरसेवक ऍड. योगेश मोकाटे यांनी आयोजन केले होते. शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने चेंबूर येथील गोविंदा पथकाने सात थर रचून हंडी फोडली. यावेळी आयोजक अध्यक्षा अंजली गोरड, राजाभाऊ गोरडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सौरभ गाडगीळ, बांधकाम व्यावसायिक प्रविण बढेकर, जगदीश राव उपस्थित होते.
कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे विशाल आणि श्वेताली भेलके यांनी दहीहंडीचे आयोजन केले. तसेच, माजी नगरसेविका वासंती नवनाथ जाधव यांच्यावतीने संयुक्त आझादनगर मित्र मंडळाने दहिहंडीचे आयोजन केले होते. यासह शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखिल आझादनगर दहिहंडी तसेच भुसारी कॉलनी, जयभवानीनगर, भारती नगर याठिकाणी विविध मंडळांकडून उत्साहात दहीहंडी सोहळा पार पडला.