बीड : जिल्ह्यातील परळी मतदारसंघात सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी हिने ठुमके लगावले.
सध्या सोशल या कार्यक्रमातील सपना चौधरीचे डान्सचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडियोवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. अशातच शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले विनायक मेटे
‘राज्यातील एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.