मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यात सामान्य नागरिकांबरोबरच करोनाशी लढा देणारे योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा विळखा घट्ट बसला असल्याचे दिसत आहे. कारण मागील २४ तासांत राज्यातील १३८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील कोरनाबाधित पोलिसा कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता ८ हजार ७२२ वर पोहचली असून, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ९७ झाली आहे. राज्यातील एकूण ८ हजार ७२२ करोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत ६ हजार ६७० पोलिसांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, सध्या १ हजार ९५५ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
Maharashtra: 138 policemen found Corona positive, 3 died in the last 24 hours, taking the death toll to 97 and total tally of #Covid19 positive policemen to 8,722.
Active cases stand at 1,955 while 6,670 policemen have recovered so far: Maharashtra Police pic.twitter.com/Y2xhBX38uJ— ANI (@ANI) July 28, 2020
करोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पहिल्या दहा देशांच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. इतकंच नाही तर दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. देशात सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, देशातील ज्या राज्यात ही संख्या जास्त आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.