बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी, साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर, वडगाव कांदळी, भोरवाडी, साकोरी, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव या गावांमध्ये खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आहे. अणे पठार भागावर शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
पूर्व भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी तूर, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, मठ, भुईमूग आदी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. सध्या बैलांचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी ट्रॅक्टर व काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने शेतकरी पेरणी करताना दिसून येत आहेत.