मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला आहे यातच दिवंगत अभिनेता इंदर कुमार यांच्या पत्नीने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि शाहरुख खानवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. इंदर कुमारच्या पत्नीने पल्लवी कुमारने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत हे आरोप केले आहेत. त्यानंतर आता तिने सलमान खानविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे.
करण आणि शाहरुखवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पल्लवीने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत. या कलाविश्वात सलमान खानने माझ्या पतीला काम करण्याची संधी दिली असं ती म्हणाली आहे. त्यामुळे एकीकडे अनेकांनी सलमानला विरोध केला असला,तरीदेखील पल्लवीने त्याला पाठिंबा दिला आहे.
“घराणेशाही ही केवळ बॉलिवूडमध्येच आहे असं नाही,तर ती सर्वच क्षेत्रांमध्ये आहे. घराणेशाहीसाठी आपण केवळ बॉलिवूडलाच दोषी ठरवू शकत नाही. कारण ही परिस्थिती आपल्या चहूबाजुला पाहायला मिळते. काही जण सलमान खानला दोषी ठरवत आहेत, मात्र त्यांनी केलेली चांगली काम लोक सहज विसरले”, असं पल्लवी म्हणाली.