प्रभात वृत्तसेवा – इंग्लंडमध्ये मिस्टर, मिस, चेअरमन, मॅडम असे शब्द नामशेष होऊ शकतील. ब्रिटनच्या मॉरनेमाउथ, क्राइस्टचर्च आणि डचपूल कौन्सिलने मिस्टर, मिस, मिसेस या शब्दांऐवजी लिंग-तटस्थता वाढविण्यासाठी प्रत्येक नावाच्या आधी लिंग ओळखणार्या शब्दांऐवजी ‘MX’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मतदानानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
एका रिपोर्टनुसार, मिस्टर, मिस, चेअरमन, मॅडम असे शब्द यापूर्वी गेले आहेत, जिथे लैंगिक भेदभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत आता ‘MX’ हा एक सामान्य शब्द वापरला जाईल. या परिषदेअंतर्गत क्षेत्राची लोकसंख्या 3 लाख 95 हजार असून संपूर्ण लोकसंख्येच्या नावासमोर तीच ओळख ठेवू इच्छित आहे. हा नवीन नियम लवकरच परिषदेच्या बैठकीत लागू करण्यात येईल, त्यानंतर अन्य अधिकृत ठिकाणीही याची सुरूवात होईल.
कौन्सिल म्हणते की हा बदल देखील आवश्यक आहे. कारण आपल्या समाजात पुरुषांबद्दल अधिनायकवादी वृत्ती आहे पण ती’MX’च्या वापरापासून दूर होईल. Mister किंवा Madam Chairman ऐवजी ‘They’ आणि ‘Chair’ हे शब्द वापरण्याची परिषदेची योजना आहे. स्वतंत्र कौन्सलर एल.जे. इव्हान्स यांनी हा प्रस्ताव आणला आहे. त्या म्हणाल्या की आपण कोणत्याही लिंगाचा उल्लेख लेखनात टाळायला हवा, कारण आता लिंगाचा प्रश्न ‘आवश्यक’ राहिला नाही.