नवी दिल्ली, दि.22- आयडीबीआय बॅंकेच्या नावाने नोकऱ्या देण्याचे आश्वासन काहीजण देत आहेत. अशा खोट्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आयडीबीआय बॅंकेने नागरिकांना केले आहे.
कर्मचारी नियुक्त करण्यासाठी आयडीबीआय बॅंकेने कुठल्याही संस्थेला काम दिलेले नाही. मात्र काहीजण आयडीबीआयमध्ये नोकरीला लावतो असे खोटे आश्वासन नागरिकांना देत असल्याच्या तक्रारी बॅंकेकडे आल्या आहेत.
काही संस्था आयडीबीआय बॅंकेचे नाव आणि लोगो वापरून नियुक्तीपत्र देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे असे बॅंकेने म्हटले आहे.