मुंबई – भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा आरोप करण्यात येत आहेत. “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच अशा कडक शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली. माध्यमांशी बोलताना राणे आदित्य ठाकरेंविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सुशांत सिंह केसमध्ये आदित्य ठाकरेंचेच नाव का समोर येते ? दाल मै कुछ काला है म्हणून आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला हवी असं नितेश राणे यावेळी म्हणाले. काल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आदित्य ठाकरेंबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसून आले.