सोमवारी शहरात एकाच दिवशी 6 पॉझिटिव्ह
सोलापूर : (प्रतिनिधी) : सोलापुरात करोनाबाधितांची संख्या आता 21 झाली आहे. आज सोमवारी मिळालेले 6 रुग्णांपैकी बापूजीनगर, आयोध्या नगरी येथील प्रत्येकी 1 तर कुर्बानहुसेन नगर आणि पाच्छा पेठ येथील प्रत्येकी 2 रुग्ण आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
हे सर्व भाग पोलिसांनी बंदिस्त केले आहेत. या भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं बजावण्यात आलं आहे. सोलापुरात आत्तापर्यंत करोना संशयित असलेल्या 778 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. यात 569 जणांचे अहवाल आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यातील 548 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर 21 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कालपर्यंत सोलापुरात 15 रुग्ण मिळाले होते. आज एकदम सहाने संख्या वाढली आहे. यात चार पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. एकूण 21 पैकी 2 रुग्णांचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे तर 19 जणांवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अद्यापही 209 जणांचा करोना चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही.