Jay Siddheshwar Swami | Devendra Fadnavis | Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पाचवी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या सोलापूरची निवडणूक लढविणार आहेत.
त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना रंगणार आहे. तर माढा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या मैदानात आहेत. ।Jay Siddheshwar Swami | Devendra Fadnavis
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा पत्ता कट करत राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली असून, आता जय सिद्धेश्वर महाराज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असणार हे लवकरच उघड होणार आहे.
जय सिद्धेश्वर महाराज किती मतांनी विजयी झाले होते?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून भाजपने जय सिद्धेश्वर महाराजांना उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या शिवाचार्य महाराजांनी 5 लाख 24 हजार मतं मिळवली होती.
जय सिद्धेश्वर महाराज यांच्याविरोधात काँग्रेसने देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मैदानात उतरवले होते. सुशीलकुमार शिंदे यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 66 हजार मतं मिळाली होती.
उमेदवारी मिळताच राम सातपुते काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे खासदार म्हणून पुन्हा एकदा निवडून जातील.
सोलापूरमध्ये देखील भाजपाचे कमळ फुलेल. सोलापूरची जनता जिल्ह्यातून भाजपाची दोन कमळाची फुले दिल्लीला निश्चित पाठवेल”, असे राम सातपुते म्हणाले.