पुणे: पुणे शहरात कंटेनमेंट झोन वगळता इतर भागास कडक संचारबंदीतुन शिथिलता मिळताच दारूचे दुकाने उघडण्यापूर्वीच शेकडो तळीरामांनी गर्दी केली. तळीरामांच्या रस्त्यावर रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे. नारायण पेठे, धायरी, शनिवार पेठेत तळीरामांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे पुण्यात केवळ मिसळ आणि चहाच नव्हे, तर दारूचीही प्रचंड क्रेझ आहे. लॉक डाऊनमुळे प्रथमच मद्यप्रेम पाहायला मिळालं.