पुणे – शहरात गेल्या 24 तासांत झालेली करोना बाधितांची वाढ ही 4 हजार 653 असून, 46 बाधितांचा मृत्यू झाला. त्यातील सात जण पुण्याबाहेरील आहेत. दिवसभरात 20 हजार 73 संशयितांच्या स्वॅबटेस्ट करण्यात आल्या आहेत.
आजपर्यंत केलेल्या 15 लाख 19 हजार 787 संशयितांच्या चाचणीपैकी 2 लाख 78 हजार 099 रुग्ण बाधित आढळले असून, त्यातील 2 लाख 35 हजार 597 बाधित बरे झाले आहेत. यामध्ये शुक्रवारी डिस्चार्ज दिलेल्या 3 हजार 337 रुग्णांचा समावेश आहे.
बाधित रुग्णांमधील 37 हजार 126 रुग्ण सक्रीय असून, त्यातील 475 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तसेच 3 हजार 651 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या 24 तासांत मृत झालेल्या 39 बाधितांचा समावेश करून आजपर्यंत 5 हजार 376 बाधितांचा मृत्यू झाला आहे.