पुणे- दिवसभरात 236 नवे बाधित सापडले असून, 243 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोनजण पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 28 लाख 72 हजार 839 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्यातील 4 लाख 86 हजार 905 जण बाधित आढळले. त्यातील 4 लाख 75 हजार 567 जण बरे झाले आहेत. मात्र सध्या असलेल्या बाधितांमधील 2 हजार 577 सक्रीय बाधित असून, त्यातील 223 जणांची प्रकृती गंभीर असून, 336 जण ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या 24 तासांत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील पाच जण पुण्यातील आहेत. त्यांचा समावेश करून आजपर्यंत 8 हजार 761 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 6 हजार 970 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे.