“पंतप्रधान स्वतःला ‘नंबर वन’ म्हणतात आणि ‘डबल इंजन’ची फसवाफसवी करून…”; प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व राजकीय पक्ष अपलाल्या परीने जोरदार तयारी करताना दिसत आहेत. त्यातच राज्य सरकारला घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवताना दिसत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेसखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

”संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुलं (जवळपास ४ लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि “डबल इंजन”ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनले.” अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधींनी ट्विटद्वारे टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे करोना परिस्थिती हाताळण्यातले अपयश लपत नाही अशा शब्दातही प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली तेव्हा करोना परिस्थिती उत्तमपणे हाताळल्याबद्दल योगी सरकारचं कौतुकह केले होते. यावरुन आपल्या ट्विटमधून प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.