मुंबई – राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय,” असं म्हणत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.
राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय. त्यांचं उदघाटन करुन शुभेच्छा दिल्या.
इथल्या चहाची टेस्टही भन्नाट आहे, बरं का!
ती घ्यायला तुम्हीही विसरु नका! pic.twitter.com/6l64EmkDIz— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 17, 2020
रोहित पवार नेहमीच आपलं मत सोशल मीडियावर मांडत असतात. यातच बारामती येथे एका उद्घाटना दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींवर खोचक टोला लगावला .
दरम्यान, “मी लहानपणी चहाच्या स्टॉलवर काम करत होतो,” अशी आठवण सांगताना अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचंही आपण पाहिलं आहे.