533 नवीन रुग्णांची भर ; 23 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील करोना रुग्णसंख्येमध्ये आणखी 533 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये शहराबाहेरील तब्बल 84 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णसंख्येने 81 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरात आजपर्यंत 81 हजार 372 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 1920 जणांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या पत्रकानुसार, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 449 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 84 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 14 व शहराबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 81,372 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 3610 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 553 रुग्णांचाही समावेश आहे.
मंगळवारी दिवसभरात शहरात 23 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील मोशी, रावेत, चिंचवड, चिखली, आकुर्डी, दिघी, कासारवाडी, किवळे, पिंपळेसोदागर, किवळे, आकुर्डी, कुदळवाडी येथील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील कुरळी, भवानीपेठ, हिंगोली, सातारा, धानोरी, मुंढवा, खेड, हडपसर येथील 9 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 882 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 75,386 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 3197 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1091 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.