684 नवीन रुग्णांची भर; 21 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 77 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज 684 नवीन रुग्णांची भर पडली असून शहरामध्ये आजपर्यंत 77,317 रुग्णांची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 684 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग चार दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 16 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरात 77,317 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 5576 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 893 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंगळवारी दिवसभरात शहरात 21 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 16 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 806 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 69,061 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 3908 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. अद्याप 1763 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.