राजेंद्र वाघमारे
नेवासा – स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात आजी – माजी आमदारांच्या आरोप – प्रत्यारोप आणि मतदार संघाच्या एकाच कामांचे दोनदा उद्घाटने करुन श्रेयवादाची लढाई तालुक्यात सुरु झालेली असल्यामुळे नेमकी सत्यता काय ? या कोड्यात जनतेचा विरंगुळा सुरु झालेला असल्यामुळे आरोप – प्रत्यारोपाच्या लढाईत जनतेची चांगलीच करमणूक होतांना दिसत आहे. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यकाळातील मंजूर झालेले कामे पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर येताच या मंजूर कामांच्या उद्घाटनाचा धडका माजी आमदार मुरकुटे यांनी मतदार संघात सुरु केलेला आहे तर माजी मंञी व विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी विकास कामे मार्गी लावण्यासाठी व केलेल्या कामांचा पाहणी दौरा करण्यात आमदार गडाख सध्या व्यस्त झालेले आहेत आजी – माजी आमदारांची सध्या श्रेयवाद आणि आरोप – प्रत्यारोपाची चांगलीच जुगलबंदी सुरु झालेली असल्यामुळे राजकिय मैदानात तापले जात आहे.
सोनई दुध संघाच्या वीज चोरी प्रकरणी सोळा संचालकांवर वीज चोरीची कारवाई कंपणींच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे यामध्ये युवानेते प्रशांत गडाख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे युवानेते प्रशांत गडाख सध्या आजारी असून हा गुन्हा वीज कंपणीकडून दाखल करण्यात आलेला असला तरी यामध्ये विरोधकांचा डाव असल्याचा आरोप माजी मंञी व विद्यामान आमदार शंकरराव गडाख यांनी केलेला आहे या आरोपाला प्रत्युत्तोतर देण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पञकार परिषद घेवून ज्या कालावधीमध्ये दुध संघ अस्तित्वात होता त्यावेळेस आमदार शंकरराव गडाख हेच आमदार होते आणि सध्याही तेच आमदार आहेत हा वीज चोरीचा गुन्हा वीज कंपणीकडून दाखल झालेला आहे त्यामध्ये विधकांचा काय संबंध ? मी शनि चौथऱ्यावर येवून समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहे मग जनतेलाही समजेल नेमकी वस्तुस्थिती काय आहे ? यासाठी आपली शनिच्या दरबारात येण्यास तयार असल्याचे प्रतिआव्हाण माजी आमदार मुरकुटे यांनी आमदार गडाख यांना केलेले आहे.
समज – गैरसमज आणि शंकांचे काहूर पेटवून विरोधकांना बदनाम करण्याचा ड्रामा आमदार गडाखांकडून खेळविला जात आहे मी गडाखांचा कालही विरोधक होतो आजही आहे आणि उद्याही राहणार असल्यामुळे मला याचे स्पष्टिकरण देणे गरजेचे असल्याचे मुरकुटे यांनी या पञकार परिषदेत स्पष्टपणे भुमिका मांडत आपण आणि प्रशांत गडाख राजकिय विरोधक असलो तरी मैञीही कायम आहे त्यांनी केलेल्या टिकेला मी कधीही उत्तरही दिलेले नव्हते ते आजारी आहेत वीज चोरी पकडणे हा वीज कंपणीचा अधिकार आहे मग विरोधकांवर चुकीचे आरोप नेमके का ? आणि कशासाठी ? असा सवालही यावेळी मुरकुटे यांनी उपस्थित करुन विरोधकांवर खोटे आरोप करुन बदनाम करण्याचा डाव गडाखांकडून आखला जात असून खोट्या आरोपाला येथून पुढे त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशाराही मुरकुटे यांनी दिल्यामुळे सध्या आजी – माजी आमदारांच्या आरोप – प्रत्यारोपामुळे नेवासा तालुक्यात राजकिय वातावरण चांगलेच तापले जात असल्याचे दिसून येत आहे.