महाराष्ट्रात सेना-भाजपची 44 जागांवर आघाडी

मुंबई – देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 48 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मतमोजणीच्या सुरवातीला सेना-भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र असून भाजप 24 जागांवर, शिवसेना 20 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर तर इतर 1 जागेवर आघाडी घेताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.