नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह हिने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
भोपाळ लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामध्ये थेट लढत असून सध्याच्या आकडेवारीनुसार साध्वी प्रज्ञा सिंह 168901 मतांसह आघाडीवर आहे तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे दुसऱ्या स्थानावर असून त्यांना आत्तापर्यंत 123434 मतं मिळाली आहेत.