‘भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणं हा अपशकुनच असतो’

नवी दिल्ली – उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचीच चर्चा सध्या देशभर होत आहे. फाटकी जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या मुलांवर काय संस्कार देणार?, असे वादग्रस्त वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली.

दरम्यान, त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही  सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. फोटोत तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच फाटकी जीन्स घातल्याचं म्हटलं जात आहे. यातच त्यांच्या या वादग्रस्त विधानावर आता मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “फाटके कपडे घालणं हा अपशकुन असतो” असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. यावरून पुन्हा एकदा वाद पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

पत्रकारांशी या मुद्यावर बोलतांना उषा ठाकूर म्हणाल्या,’ संस्कृती आणि परंपरा मानणाऱ्यांना अशापद्धतीचे कपडे परिधान करणं आवडत नाही.. माझं व्यक्तीगत मत तर हे आहे की फाटके कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीप्रमाणे अपशकून मानलं जातं.’ त्यांच्या या विधानावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान,सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचे म्हटले. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटलं आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.