रेडा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची व त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांचे निकटवर्तीय व कार्यकर्ते इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. माजी नगरसेवकाच्या घरातील त्याची पत्नी, पुतण्या,वाहन चालक व घरेलू काम करणारी महिला करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गारटकर यांचा वाहनचालक बाधित झाला आहे.
भिगवणमधील एक अपवाद वगळता तालुक्यात रुग्ण नव्हता. मे महिन्याच्या अखेरीस इंदापूर शहरातील ज्येष्ठ बाधित झाला. त्यानंतर करोनाचा फैलाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्यात 143 चा आकडा गाठला आहे. काही दिवसांत आकड्यांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
49 रुग्णांवर उपचार सुरू
सध्या इंदापूर तालुक्यात एकूण 143 करोना बाधित असून यापैकी 7 व्यक्तींचा मृत्यू देखील झाला आहे. 87 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी देखील सोडले आहे. सध्या 49 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.