केळघर (प्रतिनिधी) – अवघ्या सातशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पुनवडीत 150 जणांना करोनाची बाधा झाल्याने तर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुनवडी हे करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. बाधिताच्या संपर्कात असणाऱ्या 78 जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यातील 12 जणांचा रिपोर्ट शनिवारी करोना पॉझिटिव्ह आल्याने गावातील बाधितांची संख्या 162 वर जाऊन पोहोचली आहे.
पुनवडी येथील 78 जणांचे अहवाल पाच दिवसांपासून प्रलंबित होते. रात्री उशिरा यातील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, समुदाय अधिकारी डॉ. माधवी नलावडे, डॉ. सुप्रिया मुळे, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, तलाठी संदीप ढाकणे, आरोग्य सेविका आस्मा शेख, आशा सेविका कविता पार्टे, अंगणवाडी सेविका संजना पार्टे यांनी बाधित व्यक्ती कुणाच्या संपर्कात आले आहेत का? याची सविस्तर माहिती घेतली. त्यानुसार बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 52 व लोरिस्क मधील 29 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.