कोलकता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शनिवारी भरघोस मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून मतदानाची सुधारित आकडेवारी जारी करण्यात आली. त्यानुसार, 84 टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा हक्क बजावला.
बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. त्यातील 30 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. जिल्हानिहाय विचार करता पूर्व मेदिनीपूरमध्ये सर्वांधिक 86.32 टक्के मतदान झाले. तर पुरूलियात सर्वांत कमी (81.77 टक्के) मतदानाची नोंद झाली. सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या कालावधीत मतदान झाले. करोनाविषयक नियमांचे पालन व्हावे यासाठी मतदानासाठी दीड तास वेळ वाढवून देण्यात आला. बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे.