मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. त्याची मी हकालपट्टी केली आहे”, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली; म्हणाल्या,“तुझ्या बापाला…”
दरम्यान, पेडणेकर सोशलवर चांगल्याच ट्रोल होत आहे. त्यांचा ट्विटमुळे त्या चांगलाच वादात अडकल्या आहेत. मुंबई पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडर काढला याबाबत नेटकऱ्याने प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिल. यावरून सध्या त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे.
किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर लसीकरणाच्या टेंडर बाबत मुलाखतीचा व्हिडियो शेअर केला होता यावर एका नेटकऱ्यांनी कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटल. सध्या ट्विटवर त्यांनी दिलेल्या उत्तरावर नेटकऱ्यांनीकडून संताप व्यक्त होत आहे.