मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या सोशलवर चांगलाच ट्रोल होत आहे. त्यांचा एका ट्विटमुळे त्या चांगलाच वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडर काढला याबाबत नेटकऱ्याने प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिल. यावरून सध्या त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे.
The @mybmc mayor @KishoriPednekar ladies and gentlemen, abusing a common citizen only because he asked her a polite question! This is true @ShivsenaComms culture! This lady is the first citizen of Mumbai! Well done @OfficeofUT pic.twitter.com/xMTb7FpgXI
— Shefali Vaidya. (@ShefVaidya) June 3, 2021
किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर लसीकरणाच्या टेंडर बाबत मुलाखतीचा व्हिडियो शेअर केला होता यावर एका नेटकऱ्याने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटल. सध्या ट्विटवर त्यांनी दिलेल्या उत्तरावर नेटकऱ्यांनीकडून संताप व्यक्त होत आहे.
ट्विटरवर एका नेटकऱ्यांकडून लसीकरण्याच्या टेंडर बाबत प्रश्न विचारला होता. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आता नेटकऱ्यांनी पेडणेकर यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. दरम्यान हे ट्विट सोशलवर तुफान व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.