अहमदाबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरात शाखेच्या मुख्यालयासाठी अहमदाबाद मध्ये नवीन इमारत उभारण्यात आली असून या इमारतीचे उद्घाटन आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीला डॉ. हेडगेवार भवन असे नाव देण्यात आले आहे. ही पाच मजली भव्य इमारत मणिनगर भागात उभारण्यात आली आहे. ही इमारत उभारण्यासाठी पाच कोटी रूपये इतका खर्च आला आहे.
या इमारतीत पार्किंगचा स्वतंत्र मजला, तीन लहान मोठी सभागृहे, वाचनालय आणि निवाससासाठी खोल्या अशा सोयी करण्यात आल्या आहेत. या इमारत उभारणीसाठी ज्यांनी देणग्या दिल्या त्यांचा सत्कार सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आला. या भेटीत त्यांनी संघाच्या स्थनिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. भागवत यांचा गुजरात दौरा दोन दिवसांचा आहे.