थोड्याच दिवसांत “त्यांच्या’ कामांचा पर्दाफाश होणार

खेड तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यात दिलीप मोहिते यांचा घणाघात

सांगुर्डी – विद्यमान आमदारांनी निवडणुकांपूर्वी कामे मंजूर झाल्याचे खोटे सांगून भूमिपूजने केली आहेत. थोड्याच दिवसांत त्यांच्या कामांचा पर्दाफाश होईल, असा घणाघात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.

महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 14) कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, वाघजाईनगर, राणूबाईमळा, महात्माफुले नगर, शिक्षक कॉलनी, पठारवाडी, आगरकरवाडी, राक्षेवाडी, देशमुख आळी, भुजबळ आळी, ब्राम्हण आळी आदी ठिकाणी गावभेट दौरा पार पडला, त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, संचालक चंद्रकांत इंगवले, राजु काझी, अशोक राक्षे, संभाजीराजे खराबी, मनोज खांडेभराड, उल्हास मेदनकर, भगवान मेदनकर, सरपंच दिपाली नाणेकर, सिद्धेश नाणेकर, दादा भसे, जीवन सोनवणे, मनोहर वाडेकर, जया मोरे, संध्या जाधव, संगीता खराबी, निलेश कड, गोविंद नाणेकर, सुभाष भुजबळ, मच्छिंद्र भुजबळ, नंदाराम भुजबळ, महेंद्र मेदनकर, बाळासाहेब नाणेकर, अंकुश नाणेकर आदिंसह सर्व गावांमधील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलीप मोहिते म्हणाले की, मागील 10 वर्षे आमदारपदाच्या माध्यमातून चाकणसह लगतच्या सर्व वाड्या-वस्त्यांचा विकास केला. 23 गावांची पाणी योजना कार्यान्वित केली. नाणेकरवाडीत पाण्याच्या टाकीसाठी दोन गुंठ्यांची मागणी असताना एमआयडीसीकडून 11 गुंठे जागा उपलब्ध करून दिली. गावांचा विकास साधताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता भरीव निधी मंजूर केले. विकास कामाच्या जोरावर जनतेची साथ मला मिळत आहे.

बैलगाडा संघटनेचा पाठिंबा
खराबवाडी येथे बैलगाडा संघटनेने दिलीप मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. तर असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)