इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा अटक केली जाण्याची भीती वाटू लागली आहे. अल कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयामध्ये गेल्यावर आपल्याला पुन्हा अटक केली जाऊ शकते, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातील सत्तारुढ आघाडी सरकार आपल्याला राजकीय व्यासपीठावरून संपवण्यासाठी आपल्याला पुन्हा अटक करू शकते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नही केला होता, असा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे.
मंगळवारी विविध प्रकरणांच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात जायचे आहे. तेंव्हा अटक केली जाण्याची 80 टक्के शक्यता आहे, असे इम्रान खान यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या तब्बल 10 हजार कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महिलांचाही समावेश आहे, असेही इम्रान खान यांनी सांगितले.
आपण अल कादिरर्ट्सट भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासामध्ये सहकार्य करायला तयार आहोत, असे इम्रान यांनी “नॅसनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो’ला कळवले आहे.