अंकारा : तुर्कीयेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत विद्यमान अध्यक्ष इर्दोगन यांच्या समोर आव्हान उभे करणाऱ्या 3 प्रमुख उमेदवारांपैकी एका उमेदवाराने आज माघार घेतली आणि इर्दोगन यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे इर्दोगन यांच्या समोरील अध्यक्षीय निवडणुकीचे आव्हान थोडे सोपे झाले आहे.
दिनांक 14 मे रोजी झालेल्या तुर्कीयेतील सार्वत्रिक निवडणुकीत इर्दोगन किंवा मुख्य प्रतिस्पर्धी केमाल किलीकदारोग्लू यांच्या पैकी कोणाच्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदान घेण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी सिनान ओगान यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ते “किंग मेकर’ ठरण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली होती.
अतिउजव्या- कट्टर आणि शरणार्थी विरोधी पक्षाचा पाठिंबा त्यांना होता, त्यांनी 14 मे च्या मतदानात 5.17 टक्के मते जिंकली होती आणि आता ते शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाचे प्रमुख दावेदार ठरू शकले असते.
इर्दोगान यांनी शुक्रवारी इस्तंबूलमध्ये तुर्कीच्या नेत्याशी अचानक भेट घेतल्याच्या काही दिवसांनंतर ओगान यांनी त्यांचे समर्थन केले आहे.