narendra modi – इस्रोच्या (isro) गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून आज जी यशस्वी चाचणी घेण्यात आली त्यातून भारताचा मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम साकारण्याचा हेतू एक पाऊल जवळ घेऊन गेला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी या घटनेचे स्वागत केले आहे.
या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे (isro scientists) अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्सवर हा अभिनंदन संदेश पाठवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सोशल मिडीयावर पोस्ट टाकून वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
अंतराळात मानव पाठवण्याच्या भारताच्या उद्दीष्ठाच्या दिशेने इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी ही एक उत्तुंग कामगिरी नोंदवली आहे असे त्यांनी म्हटले आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल संपुर्ण देशभरातून वैज्ञानिकांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.