नवी दिल्ली – देशातील कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधताना १८ मेपासून लॉक डाऊनचे चौथे पर्व लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी लॉक डाऊनचा चौथा टप्पा इतर टप्प्यांपेक्षा वेगळा असणार असून त्याबाबतची माहिती १८ मेपूर्वी दिली जाईल असं देखील सांगितलं होतं. अशातच आता लॉक डाऊनचा चौथा टप्पा लागू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं असून आपल्याला कोरोना विषाणू संकटाशी सामना करत जीवन जगण्याची कला विकसित करावी लागणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे लॉक डाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात येणार असला तरी कोरोना सोबत जगणं अर्थात को-एक्सिस्टिंग विद कोरोनाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट झालंय. कोरोना सोबत जगत असताना घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर, इतरांपासून किमान १ मित्राचे अंतर ही काळजी घेण्यासंबंधीच्या सूचना गडकरींनी केल्या.
यावेळी बोलताना गडकरी यांनी लॉक डाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेली केश कर्तनालये, ब्युटी पार्लर व मॉल्स लवकरच सुरु केली जातील मात्र त्यांनी कोरोना संबंधीच्या खबरदारी घ्यायला हवी असं देखील सांगितलं.
#WATCH We need to learn art of living with Corona. Mask is mandatory,maintain more than 1 metre distance, use sanitiser every time entering into house/office. I’m expecting that it (beauty parlour/salon/malls) will open early but,need to follow guidelines: Union Min Nitin Gadkari pic.twitter.com/t7IcvRAfan
— ANI (@ANI) May 13, 2020