पुणे – शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा येत्या गुरूवारी बंद राहणार असून, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे. बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जलवाहिन्यांवरील ठाकरसी टाकी आणि भामा आसखेड येथील उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
येरवडा पूर्व, लक्ष्मीनगर, यशंवत नगर, भाटनगर, जयजवाननगर, आंबेडकर सोसायटी, संगमवाडी, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, जयप्रकाश नगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर संपूर्ण परिसर, आदर्शनगर, हरीनगर, रामवाडी, आळंदी रोड, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, जाधवनगर, मेंटल हॉस्पिटल परिसर, साप्रस, फुले नगर, भारतनगर, आदर्श इंदिरा नगर, विश्रांतवाडी, प्रतिकनगर, कस्तुरबा सोसायटी, पंचशीलनगर, श्रमिक वसाहत, नागपूर चाळ, हौसिंगबोर्ड, शांतीरक्षक सोसायटी, राम सोसायटी, अहिल्यापर्णकुटी सोसायटी, कलवड, खेसेपार्क, धानोरी, मुंजाबावस्ती, भैरवनगर, श्रमिकनगर विमाननगर, सोपाननगर, गुरुद्वारा, दादाचीवस्ती, लोहगांव, टेम्पोचौक, साईनाथ नगर, वडगांवशेरी संपूर्ण परिसर.