रायपूर – छत्तिसगढचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शुक्रवारी मंत्र्यांचे खातेवाटप केले. त्यानुसार, विजय शर्मा आणि अरूण साव या उपमुख्यमंत्र्यांकडे महत्वाची खाती सोपवण्यात आली. शर्मा यांच्याकडे गृह, पंचायत आणि ग्रामविकास, तर साव यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, नगर प्रशासन खात्यांची धुरा देण्यात आली.
अर्थ या आणखी एका महत्वाच्या खात्याची जबाबदारी ओ.पी.चौधरी सांभाळतील. मुख्यमंत्र्यांनी खनिज संपत्ती, ऊर्जा, परिवहन, सामान्य प्रशासन आणि इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात न आलेली खाती स्वत:कडे ठेवली आहेत.
छत्तिसगढमध्ये सध्या १२ मंत्री आहेत. त्या राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये कॉंग्रेसला पराभूत करून भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतर विलंबाने मुख्यमंत्री निवड आणि मंत्रिमंडळ रचना झाली. आता तेथील खातेवाटपही मार्गी लागले आहे.