अहमदनगर : आपल्या लाडक्या बाप्पाला राज्यात सर्वच ठिकाणी निरोप देण्यात येत आहे. त्यातच अहमदनगरमध्ये देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीस जोशात सुरूवात होवून संध्याकाळी सात वाजून एक मिनीटानी ग्रामदैवत विशाल गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, मुख्य मिरवणुकीतील चार गणेश मंडळ चितळे रोडवर अजूनही आहेत. तसेच इतर नव्या आणि जुन्या कापड बाजार रस्त्यावर मिरवणुका पोहचल्या आहेत. दरम्यान, शहरात चौका चौकामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वांनी तयारी सुरू केली होती. तसेच प्रत्येक चौकात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.