सातारा : राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरू आहे. त्यातच सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, शहरातील मोती चौकात उपनगरातील गणेशमुर्त्यांचे आगमन झाले आहे. ढोल पथकांच्या निनादात बाप्पांचे स्वागत होत आहे. मिरवणूकीदरम्यान, पावसाने हजेरी लावल्यामुळे मिरवणुकीत आणखी रंग भरले जातील.
दरम्यान, शहरातील मानाच्या सर्वच गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीस उत्साहात सुरूवात झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि पोलिस अधिक्षकांनी तेजस्विनी सातपुते यांनी हजेरी लावली. गणेश विसर्जन हे अत्यंत शांततेत पार पडण्याची प्रार्थना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तर विसर्जन मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिस अधिक्षकांनी म्हटले आहे.