लोणी धामणी – वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल सोनल भालेराव यांनी त्यांची वन परिमंडळ धामणी टीम व रेस्क्यू मेंबर तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील राष्ट्रीय सेना योजनेतील विद्यार्थी यांच्या समवेत प्रगती विद्यालयात वन्यजीव सप्ताह अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना, “मी बिबट्या बोलतोय’ हा बिबट्या विषयीचा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
दरवर्षी 1ते 7ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीवांबद्दल वनविभागामार्फत जनजागृती केली जाते. त्या अनुषंगाने वनपाल भालेराव व संपूर्ण टीम, रेस्क्यू मेंबर यांचे सहित वडगाव पीर येथे माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण पर्यावरण तसेच बिबट व मानव जीवन,
बिबट्यांविषयी कशी खबरदारी घ्यावी याबद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण याविषयी अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले. चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन केले असून सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.
यावेळी वनसेवक दिलीप वाघ, बाळासाहेब आदक रेस्क्यू टीम मेंबर सोन्या बापू लंके, कल्पेश बढेकर, गोरक्ष सिनलकर ऋषिकेश कोकणे, विनोद तांबे तसेच माजी सरपंच संजय पोखरकर, माजी उपसरपंच अण्णासाहेब पोखरकर, शाळा व्यवस्थापन समिती उप अध्यक्ष रमेश रोकडे, ग्रामस्थ, प्राथमिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक वृंद, ग्रामस्थ उपस्थित होते.