मंचर – लोणी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतून 2 हजार 106 रुपयांचा दारुसाठा मंचर पोलिसांनी जप्त केले. लोणी-धामणी परिसरात मंचर पोलीस गस्त घालत असताना मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांना फोनद्वारे कळविले होते.
लोणी-पाबळ रस्त्यावर हॉटेल शिवांशच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बबन गवस (मूळ रा. नागणवाडी ता. चंदगड, जि. कोल्हापूर. सध्या रा. आंबेगाव) हा इसम बेकायदा देशी, विदेशी दारु विक्री करत आहे.
त्या ठिकाणी मंचर पोलीस गेले असता, शिवांश हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत त्यास दारु विक्री करत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोलीस कर्मचारी प्रशांत भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.