मुंबई – क्रुज ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याच्या अनेकनंतर एनसीबीचे अधिकार समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. आता भाजपचे मोहित भारतीय यांनी मलिक यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यावर मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं असून उद्या सांगतो खरं काय ते असं ते म्हणाले.
मलिक यांनी NCB च्या कारवाईवर जे प्रश्नचिन्ह उभे केलेत त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं मोहित भारतीय म्हणाले. तर, मोहित भारतीय हे समीर वानखेडे यांचे हस्तक असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे यांच्या खासगी आर्मीतील सदस्याने पत्रकार परिषद घेऊन सत्य बाबींवरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच, या प्रकरणाला वेगळं वळण देण्यात येत आहे. त्यामुळे, मी उद्या पत्रकार परिषद घेऊन खरं काय ते सर्वांसमोर मांडेन, असे नवाब मलिक यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
A member of Sameer Dawood Wankhede’s private army just held a Press Conference to misguide and divert the attention from the truth albeit unsuccessfully.
I will reveal the truth tomorrow— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 6, 2021
याआधी मोहित भारतीय आरोप केले की, या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखचा मित्र आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीबाबत सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यात व्हॉट्सअप संवाद झाला आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखालीच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. त्याला आज भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.