मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही स्वभावाप्रमाणे सडत चालला आहे, अशी जोरदार टीका केली. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला.
जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांचे ट्वीट रिट्वीट करत थेट इशारा दिला. आव्हाड म्हणाले, “ताई मी कुठली ही शिवी दिली नाही. फक्त मला कोणाची तोंडं उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. ‘तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब नंगे हैं’ बापूआर्मस्ट्राँग आठवत असेल ना. यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. अँटी चेम्बरमधले विनोद आत्ता बस.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले… https://t.co/DatnmGbb1x
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2023
“आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहित आहे. मी सहन करतो, पण मला त्यांनीच बोलावे ज्यांचे हात स्वच्छ आहेत. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला सांभाळून घेत आलो, पण…”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना थेट इशारा दिला.
दरम्यान, या अगोदर चित्रा वाघ यांनी, “सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली. आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय.” अशी सडकून टीका केली होती. याच टीकेला आता आव्हाडांनी उत्तर दिले आहे.