कानपूर : प्रख्यात कवी फैझ अहमद यांची लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है ही कविता हिंदुविरोधी आहे का? हे ठरवण्यासाठी कानपूरच्या द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) समिती स्थापन करण्यात आली आहे. काही प्राध्यापकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही समिती स्थापन करण्यात आली.
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी 17 डिसेंबर रोजी दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवणारा मोर्चा काढला होता. या मोर्चात विद्यार्थ्यांनी लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है हे गीत गायले होते. मात्र आयआयटीचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी या गीतावर नंतर आक्षेप घेतला. ते म्हणाले, व्हिडिओत विद्यार्थ्यांनी फैझ यांची कविता म्हटली असल्याचे दिसत आहे. हे काव्या हिंदू द्वेष्टे आहे.
या कवितेच्या शेवटच्या ओळीत सर्व मुर्ती नष्ट केल्या तरी अल्लाहचे अस्तित्व कायम राहील, असे म्हटले असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. दरम्यान या प्राध्यापकावर समाज माध्यमांत जातीय विद्वेषक मजकूर टाकल्या प्रकरणी बंदी घालावी अशी मागणी केली आहे. आयआयटी कानपूर विद्यार्थ्यांच्या वेब पोर्टलवर मात्र या गीताचा मुळ अर्थ खाय आणि जामियात केलेल्या हल्ल्याला ते कसे लागू होते हे सांगणारा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
वाचकांसाठी मुळ कविता
हम देखेंगे
लाज़िम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिसका वादा है
जो लोह-ए-अज़ल में लिखा है
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महक़ूमों के पॉंव तले
ये धरती धड़-धड़ धड़केगी
और अहल-ए-हक़म के सर ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत उठवाए जाएँगे
हम अहल-ए-सफ़ा, मरदूद-ए-हरम
मसनद पे बिठाए जाएँगे
सब ताज उछाले जाएँगे
सब तख़्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा अल्लाह का
जो ग़ायब भी है हाज़िर भी
जो मंज़र भी है नाज़िर भी
उट्ठेगा अन-अल-हक़ का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा
जो मैं भी हूँ और तुम भी हो