नवी दिल्ली : बुधवारी ऑस्ट्रेलियात जंगला लागलेली आग इतर भागात पसरली आहे. या आगीत आणखी 5 जणांचा मृत्यू झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहे. या लागलेल्या आगीत एकूण 18 ठार, तर 916 घरे जाळून खाक झाली आहेत. 8,159 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
सर्वाधिक आगीचा परिणाम बाटेमन्स बे, कोबरगो आणि नोवरा भागात झाला आहे. आग व्हिक्टोरिया राज्याच्या किनारपट्टीच्या भागाकडे जात असल्याची माहिती अग्निशमन आयुक्त शेन फिटझीमन्स यांनी दिली.
बचाव कार्य चालू असून अनेक लोक आगीत अडकले आहेत. धुरामुळे नादात आणि बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.