मुंबई – गोपीचंद पडळकरजी आपली राजकीय उंची आपणास फार मोठी झाली वाटते म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकचे उदघाट्न शरद पवार यांच्या अगोदर करण्याचे ठरवले आहे. येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी फुकटेगिरी का दाखवता. फक्त देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका.
हिंमत असेल संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवा. असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे.