raj thackeray – बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राज ठाकरेंनी raj thackeray आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता माता हे फक्त हिंदूंचे दैवत नाही असं विधान केलं.यावरून आता भाजप नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?’ असा प्रश्न विचारला आहे. मराठीच्या प्रश्नावरून भाजप मनसेत आता वाद सुरु झाला आहे.
आमच्यामराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठीप्रेम हे पुतनामावशीच प्रेमआहे.हिम्मत असेल तर गुजराथी ऐवजी मराठीमाणसाला पंतप्रधानकरा मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेंव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहत आणि कोण पाठीला पाय लावून पळत महाराष्ट्राला माहित आहे.दीपावलीच्या शुभेच्छा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 11, 2023
या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे ते म्हणाले ,”आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठीप्रेम हे पुतनामावशीच प्रेम आहे. हिम्मत असेल तर गुजराथी ऐवजी मराठीमाणसाला पंतप्रधान करा, मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेंव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहत आणि कोण पाठीला पाय लावून पळत महाराष्ट्राला माहित आहे. दीपावलीच्या शुभेच्छा..!’ असं म्हणत देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिल आहे.
तत्पूर्वी, आशिष शेलार पुढे म्हणाले की,’दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल’ असेही ते म्हणाले आहे.