मंचर, (प्रतिनिधी) – विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना शिकवा, विद्यार्थ्यांनीही प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित आहे, असे मत प्राचार्य मेजर डॉ. शत्रुघ्न थोरात यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय व दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व युवक महोत्सवाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने झाले. भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सदस्य नितीन वाव्हळ, रामचंद्र ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी भीमाशंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत ढगे, सचिव वसंतराव जाधव, बी. डी. चव्हाण यांचा सह प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य मेजर डॉ. शत्रुघ्न थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने प्राध्यापक कायम कार्यबद्ध असतात.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाबरोबर त्यांच्या मध्ये असलेले सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय व दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रा. प्रियंका वायाळ व प्रा.राहुल डोळस यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रामनाथ फदाले यांनी आभार मानले.