मुंबई – राज्यात मागील दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रतिदावेही समोर येत असून अनेक राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
अश्यातच, आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांना खुलं आव्हान देखील दिल्याचं दिसून आलं. यावेळी नितेश राणे माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, “संजय राऊत हे खरंच राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्यांनी आता त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं..’ असं चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं आहे. संजय राऊतचा लव्ह जिहाद झाला आहे. त्याचं शुद्धीकरण करणं अजून बाकी आहे. संजय राऊत दोन पायांनी परत येणार नाही, असंही नितेश म्हणालेत.
तसेच ते पुढे म्हणाले, “उरूस जातो. धूप दाखवतात पण आत जाण्याचा हट्ट करत नाहीत. तिथल्या मुसलमानांचा आग्रह होता की चादर टाकायची. जिहादी आहेत. बोलायला फाटल्यावर कोणी स्वत:ला शिवभक्त म्हणेल. आज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घुसले. उद्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये घुसतील. हे आम्ही चालू देणार नाही. अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. असं देखील नितेश राणे यावेळी म्हणाले.