मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. सध्या चित्रपटांसोबत प्रिया वेब सिरीजमध्येही दिसत आहे.
“सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सिरीजमध्ये प्रियाने लेस्बियन महिलेची भूमिका केली. या सिरीजमध्ये तिचा एक किसिंग सिन होता. त्यावेळी या सिनची बरीच चर्चा झाली होती. एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच.
त्यात जर ती अभिनेत्री प्रिया बापट सारखी असेलतर अनेक चर्चा रंगू लागतात. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या सिरीजमध्ये लेस्बियन लिपलॉक केल्यानंतर तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं होतं. दरम्यान, या व्हिडिओ नंतर बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझननंतर त्याच लोकांनी माझं कौतुकही केलं. असं प्रियाने सांगितलं.
नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्रिया बापट हिने याबद्दल आपलं मत मांडलं आहे. तसेच, ‘अभिनेत्री दीपिकाने इंटिमेट सीन केला तर तो परफॉर्मन्स आणि मराठी अभिनेत्रीने केला की ट्रोल करतात’. ही खंत देखील बोलून दाखवली आहे. यावेळी बोलताना प्रिया म्हणाली की…,
“मराठी अभिनेत्री हिंदीत गेली की, हिंदीत तिला काम मिळावं म्हणून तिनं इंटिमेट सीन्स केले असं म्हटलं जातं. पण मग दीपिका पदुकोण ‘गेहराइयाँ’मध्ये तसेच सीन्स करते तेव्हा तिला ट्रोल केलं जात नाही. तेव्हा तुम्ही त्याकडे कलाकार आणि परफॉर्मन्स म्हणून बघता. मला मात्र ‘इंटिमेट सीन केलेस. तुला कसं वाटलं?’ असा प्रश्न विचारला जातो. मुळात हा प्रश्नच का येतो? माझ्या कामाचा भाग म्हणून माध्यमच त्याकडे का नाही बघत? कथेचा, कामाचा भाग म्हणून मी ते केलं. तिथे विषय संपला.’ असं प्रिया म्हणाली.