एखादी व्यक्ती जागेला, संस्कृतीला हिणवत असेल तर ..

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावर आता  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी थेट मत मांडलं आहे. वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात त्या म्हणाल्या,’खूप जास्त खोटं बोललं की आपण काय बोलून गेलो ते लक्षात रहात नाही. कंगनाचं तसंच झालंय. आत्ता ती जे बोलते आहे त्या वक्तव्यांच्या विरोधात ती याआधी बोलून गेली आहे. पण तिला ते आता लक्षात नाही. तिच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या,‘मी हिमाचल प्रदेशमधून पळून आले होते.’ ‘मी ड्रग अॅडिक्ट होते. असं ही ती या आधी म्हणली आहे. आत्ता ती जे काही बोलते आणि वागते आहे त्याबाबत मला बोलण्याची इच्छा नाही. पण दुर्दैवाने बोलावं लागतं आहे. एखादी व्यक्ती एखाद्या पक्षाला, जागेला किंवा संस्कृतीला हिणवत असेल, सारखं चिथवत असेल. तर जे उत्तर देणंही गरजेचं असतं’ असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.